areested

जबरी चोरी करणारे तिघे मुद्देमालासह गजाआड

केज क्राईम न्यूज ऑफ द डे

केज पोलीसांची कारवाई

केज :  रस्त्यावर अडवून मोबाईल, सोन्याची अंगठी, कानातील बाळी व रोख रक्कम घेवून लंपास झालेल्या तीन आरोपींना केज पोलीसांनी गजाआड केले. यावेळी त्याच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी केज यांच्या न्यायालयात हजर केले असता 13 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

     दि. 8 जुलै रोजी विजय रामभाऊ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन आरोपी विरोधात केज पोलिस ठाण्यात लुटमार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते 7 जुलै रोजी रात्री 10.30 वाजता केज ते कानडीमाळी रोडवरील सोनारवाडा या शेताजवळ पुलावरून विजय रामभाऊ कदम व त्याचे वडील राजाभाऊ दत्तात्रय कदम रा.कानडी रोड केज हे त्यांच्या दुचाकीवरुन जात असतांना अज्ञात तीन इसमांनी अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील एक ओप्पो कंपनीचा मोबाईल 17 हजार 700, दोन ग्रॅम सोन्याची कानातील बाळी व खिशातील रोख पाच हजार व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण 44 हजार 700 रूपयाच मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला होता. यावेळी आरोपी आणि फिर्यादीमध्ये झटापट झाल्यानंतर एका आरोपीला फिर्यादीने ओळखले होते. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यानंतर आरोपी निखिल उर्फ दाद्या राजाभाऊ मस्के (वय 21 रा.क्रांतीनगर केज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने इतर दोन्ही साथीदार कोण होते याची पोलिसांना माहिती दिली. यामध्ये आकाश बापु लोंढे (वय 29 रा.क्रांतीनगर केज), विशाल उर्फ बबलु सरवदे ( वय 25 रा.क्रांतीनगर केज) अशी नावे सांगितल्याने पोलिसांनी त्यांना 8 जुलै रोजी अटक केली. 9 जुलै रोजी त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी केज यांच्या न्यायालयात हजर केले असता 13 जुलै पर्यंत पोलिस कस्टडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्याच दिवशी माजलगाव ते साळेगाव रोडवर तीन इसमाने एका जणाला चाकुचा धाक दाखवून त्याच्याकडून 27 हजार 400 रूपयाचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता. या प्रकरणात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांना वरील आरोपीनेच ही देखिल चोरी केली असल्याचा संशय आहे. 13 जुलैपर्यंत तीन आरोपीला पोलिस कोठडी झाल्याने यामध्ये दुसराही गुन्हा उघड होण्याची शक्यता आहे. सदरील कामगिरी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक त्रिभुवन, सपोनि संतोष मिसळे, पोना.नामदास, पो.ना.करवंदे, पोना.गवळी, पोना.शेख, पोना.चादर यांनी केली.

Tagged