wait

बीड : का होतोय आजच्या रिपोर्टला उशीर?

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.10 : आज बीड जिल्ह्याचे रिपोर्ट corona report यायला मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून ही माहिती माध्यमांना देण्यात आली.
रिपोर्ट उशीरा येण्याबाबत कार्यारंभने प्रशासनाकडे विचारणा केली असता असे सांगण्यात आले की, आज बीड आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाईत आलेले आहेत. त्यात दुपारी टेक्निकल प्रॉब्लेम आल्याने काही वेळ कामात व्यत्यय निर्माण झालेला होता. त्यामुळे आज रिपोर्ट यायला किमान 12.30 ते 1.30 वाजतील अशी शक्यता असल्याचे आरोग्य विभागातील सुत्रांनी सांगितले. जिल्हा माहिती कार्यालयातूनही या बाबत सुचना देण्यात आली असून आजचे रिपोर्ट यायल उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे स्वॅब लातूरच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी जात असतात. मात्र तिथेही स्वॅबची संख्या मोठी असल्याने ते अंबाजोगाईला पाठविण्यात आले आहेत.

आज बीड जिल्ह्यातून पाठविण्यात आलेले स्वॅब पुढील प्रमाणे
1) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 22
2) कोविड केअर सेंटर बीड 90
3) ग्रामीण रुग्णालय आष्टी 15
4) ग्रामीण रुग्णालय माजलगाव 27
5) उपजिल्हा रुग्णालय गेवराई 18
6) उपजिल्हा रुग्णालय केज 14
7) उपजिल्हा रुग्णालय परळी 66
8) कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 24
9) स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाई 16

   एकूण बीड जिल्हा- 292 

Tagged