corona-death

बीड जिल्हा : 48 तासात तिघांचा मृत्यू

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

बीड : विविध ठिकाणी उपचार घेणार्‍या बीड जिल्ह्यातील तीन रूग्णांचा मागील 48 तासात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पाटोदा तालुक्यातील येवलवाडी व बेनसुर येथील दोन रुग्णांवर पुण्यात उपचार असताना त्यांचा मृत्यू झाला. तर गेवराई तालुक्यातील उमापूरच्या रुग्णाचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णांना अगोदरच कॅन्सर, न्यूमोनिया व इतर आजार होते. त्यात कोरोनाची भर पडली होती.

Tagged