कोरोना अपडेट

राजभवन हादरले; 16 कर्मचार्‍यांना कोरोना

By Karyarambh Team

July 12, 2020

मुंबई : राजभवनातील 16 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. नऊ दिवसांपूर्वी राजभवनातील दोन कर्मचार्‍यांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते.

त्यानंतर त्या कर्मचार्‍यांच्या निकटच्या संपर्कातील 24 जणांसह एकूण 100 कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या याचणीत 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राजभवतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 झाली आहे. राजभवनातील 16 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्टाफ क्वार्टर्स प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले असून संपूर्ण परिसराचे सॅनिटायझेशन करण्यात आल्याची माहिती ‘डी’ वॉर्डचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली. दरम्यान, मोठ्या संख्येने कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेदेखील क्वारंटाइन झाल्याची माहिती मिळाली आहे.