कोरोना अपडेट

बीडमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी

By Karyarambh Team

July 12, 2020

बीड : गत 24 तासात जिल्ह्यात तीन बळी गेलेले असताना आणखी एकाचा कोरोनामुळे बीड शहरात मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील मिलीया कॉलेज परिसरात 75 वर्षीय कोरोनाबाधित महिला आढळून आली होती. त्या महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे काल स्पष्ट झाले होते. तिच्यावर उपचार सुरु असताना आज (दि.12) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हा कोरोनाचा 11 वा बळी आहे.