biocon

बीड

खुशखबर : कोरोनावरील लसीपाठोपाठ आता औषधही आलं

By Karyarambh Team

July 13, 2020

echo adrotate_group(3);

भारतातील बायोकॉन कंपनीकडून घोषणा

मुंबई, दि.13 : कोरोनाची लागण झाल्यानंतर जगातील विविध देश विविध प्रकारची औषधं आणि इंजेक्शन अजमावून पहात आहेत. परंतु आतापर्यंत हमखास असं कुठलंच औषध आणि इंजेक्शन कोरोनावर लागू पडत नव्हते. परंतु आता भारतातील औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी बायोकॉनने biocon एक नविन औषध आणत असल्याची घोषणा केली आहे.echo adrotate_group(6);

बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने biocon इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. कोविड-19 ची सामान्य ते गंभीर लक्षणं असणार्‍या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे. बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे. जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रुपाने बायोलॉजिक थेरपीला मंजुरी देण्यात आली असल्याचे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. करोना व्हायरसची मध्यम ते गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या, श्वासोश्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ म्हणाल्या, कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला प्राण वाचवणार्‍या औषधांची गरज आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळाली तरी पुन्हा इन्फेक्शन होणार नाही, याची कुठलीही खात्री सध्या कुणीच देऊ शकत नाही. आपल्याला अपेक्षित आहे, असेच काम ती लस काम करेल याची कुठलीही खात्री नाहीये. त्यामुळे आपल्याला तयार राहिले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. इटोलीझुमॅबच्या एका इंजेक्शनची किंमत 7,950 रुपये आहे. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत 32 हजार रुपये आहे.echo adrotate_group(8);

दिलासादायक बातम्या येण्यास सुरुवातकालच रशियाच्या सेचेनोव कंपनीने लस तयार केल्याचा दावा केला होता. तर आज भारतातील बायोकॉन कंपनीने बाजारात औषध आणत असल्याची घोषणा केली आहे. यापुर्वी भारत बायोटेक या कंपनीनेही 15 ऑगस्टपर्यंत क्लिनिकल ट्रायल पूर्ण करून लस लॉन्च करण्याचा विचार केला आहे. तसे आयसीएमआरनेच सांगितलेले आहे. त्यामुळे गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाने परेशान झाले होते आता कुणालाच कुठून कसलाच उपाय सापडत नव्हता. लॉकडाऊन त्यावर कंट्रोल ठेवत असले तरी तो त्याच्यावर परिपूर्ण उपाय ठरत नव्हता.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);