Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्हा : एका कोरोनाग्रस्तांचा आणि दोन संशयिताचा जिल्ह्यात मृत्यू

DEATH BODY

DEATH BODY

echo adrotate_group(3);

echo adrotate_group(6);

बीड/ अंबाजोगाई : बीड शहरातील थिगळे गल्लीतील एका 78 वर्षीय कोरोनाग्रस्त वृद्धाचा आज पहाटे साडेतीनच्या सुमारास मृत्यू झाला. शिवाय पाटोदा तालुक्यातून आलेल्या एका 48 वर्षीय संशयित रुग्णाचाही मृत्यू झाला. त्याचा स्वब रिपोर्ट आज येणार आहे तर तिकडे अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये आज पहाटे एकाचा मृत्यू झाला. या 32 वर्षीय व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याचा सोमवारी स्वब घेतला होता. अद्याप त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.echo adrotate_group(8);


केज तालुक्यातील नांदूरघाट येथील तरूणाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे केजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने सोमवारी दुपारी त्याचा स्वॅब घेण्यात आला. रात्री उशीरा तो अत्यावस्थ झाल्याने त्याला १२.३० वाजता अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे अवघ्या तासाभरात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या तरूणाच्या स्वॅबचा रिपोर्ट आज (मंगळवारी) येण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);

Exit mobile version