Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड ग्रामीण पोलीसांनी केली अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड

arrested criminal corona positive

beed police

echo adrotate_group(3);

कार, दोन चाकूसह चोरीसाठीचे सहित्य जप्त

बीड  :  जालना येथील अट्टल दरोडेखोरांची टोळी बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील माळापुरी येथे दरोड्याच्या तयारीत होती. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलीसांनी मोठ्या शिताफीने मंगळवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास ही टोळी गजाआड केली. या कारवाईमुळे बीड ग्रामीण पोलीसांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले. echo adrotate_group(7);

       किशोर शिवदास पवार (वय 24 रा.वडीगोद्री ता.अंबड जि.बीड), राम लक्ष्मण जाधव (वय 23 रा.उमापूर ता.गेवराई), दादा लाला जाधव (वय 20 रा.उमापूर ता.गेवराई), विजय ज्ञानदेव चांदणे (वय 24 रा.रामगांव ता.अंबड जि.जालना) व अन्य एका अल्पवयीन आरोपीचा यामध्ये समावेश आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास माळापुरी येथे कुर्ला रोड परिसरात दरोड्याच्या तयारीत असताना गस्तीवर असलेले सपोनि.योगेश उबाळे व टिमने यांना ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवून त्यांची चौकशी केली असता दरोड्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसात कलम 399, 402, 188, 269, 270 भादंवि 51 ब, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक भास्करराव सावंत, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि.सुजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.योगेश उबाळे, चालक कृष्णाकांत बडे, होमगार्ड यांनी केली आहे.echo adrotate_group(5);

कार, चाकू साहित्य जप्त
यावेळी या दरोडेखोरांकडून एक कार (एमएच-48-एफ-3253), बॅटरी, दोन चाकू, पाच मोबाईल, स्क्रडा्रव्हर असे साहित्य पोलीसांनी जप्त केले आहे.echo adrotate_group(9);


पाच आरोपी अन् एक अधिकारी
गाडीतील इसम दरोड्याच्या तयारीत असल्याचा अंदाज सपोनि.योगेश उबाळे यांना आला होता. पण सोबत चालक बडे व एक होमगार्डच होता. त्यामुळे त्यांनी दरोडेखोरांना संशय येवू नये यासाठी त्यांच्या गाडीसमोर गाडी उभी करत हेडलाईट चालकाच्या डोळ्यावर चमकवली. आणि क्षणार्धात गाडीतून उतरत थेट दरोडेखोरांच्या डोक्याला रिव्हॉल्वरच लावले. यावेळी गाडीतील दोन दरोडेखोर जागे होते, तर तिघे झोपल्याचा फायदा घेत त्यांनी दरोडेखोरांना रोखून धरले. व पोलीसांना पाचारण करत त्यांना ताब्यात घेतले.

The villagers thanked the Beed Rural Police.

अन् माळापुरी परिसरातील ग्रामस्थांनी मानले आभार
या दरोडेखोरांनी माळापुरी परिसरातील काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चोरी केली नाही. तसेच पिपंळनेर हद्दीतून येत असतांना काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला परंतु गस्तीवर असलेल्या पोलीसांमुळे तोही प्रयत्न फसला. बीड ग्रामीण पोलीसांनी दरोडेखोरांना गजाआड केल्यामुळे माळापुरीसह परिसरातील ग्रामस्थांनी बीड ग्रामीण पोलीसांचे आभार मानले.  


भुरट्यासह धाडसीही चोर्‍या
सदरील चोरटे हे अट्टल दरोडेखोर आहेत. चारचाकीमध्ये फिरत फिरत जे दिसेल त्याची चोरी करतात. यामध्ये त्यांनी आतापर्यंत विविध जिल्ह्यातून शेळ्या, बैल, इतर जनावरे, चारचाकी कार, शेतातील विद्यूत मोटार अशा अनेक ठिकाणी चोर्‍या केलेल्या असल्याची कुबूलीही पोलीसांना दिली आहे.

echo adrotate_group(10);
Exit mobile version