कोरोना अपडेट

बीड जिल्हा : परळीत चार तर बीडमध्ये एक पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 14, 2020

बीड : जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा एकदा पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यात परळीतील चार तर बीडमधील एकाचा समावेश आहे.

परळीत पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये, सर्वजण पूर्वीच्याच पॉझिटिव्ह रुग्णाचे सहवासित आहेत. यामध्ये शहरातील आझादनगरमधील 18, 20, 18, 30 या वयोगटातील महिला तर बीडमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यामध्ये 54 वर्षीय पुरुषाचा समावेश असून त्रिमुर्ती कॉलनी, नं.3 दत्तनगर बीड येथील रहिवासी आहे. तो गुजरात येथून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.