beed police

कोरोना अपडेट

पोलीस कोठडीतील आरोपी पॉझिटीव्ह

By Karyarambh Team

July 15, 2020

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील प्रकार 

माजलगाव : माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या अत्याचार प्रकरणातील एक आरोपी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला. 

        मागील पाच दिवसापासून तो माजलगाव ग्रामीण पोलीस यांच्या ताब्यात होता. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला. बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  सदरील आरोपी हा फिर्यादी यांच्या नातेवाईकांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे हजर केला होता. तसेच त्याचा जास्त पोलीसांशी संपर्क आलेला नाही. व संपर्कात आलेल्या पोलीसांनीही योग्य ती खबरदारी घेतली होती. तरीही कॉन्टॅक्ट ट्रेस करुन संपर्कात आलेल्या पोलीसांचे स्वॅब पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक श्रीकांत डिसले यांनी दिली.