police crime

क्राईम

सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

By Karyarambh Team

July 15, 2020

मनासारखा पंचनामा करण्यासाठी मागितली लाच

बीड :  दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे यासाठी तक्रार दाराकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास रंगेहाथ बुधवारी (दि.15) पकडले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. 

     दिलीप रामचंद्र कुरेवाड, (वय 50, सहाय्य फौजदार, पो.स्टे. सिरसाळा) व संतोष सूर्यभान घोडके, (वय-42 पोना, पो.स्टे. सिरसाळा) यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. त्यांनी सिरसाळा येथे दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे याचा मोबदला चार हजार रुपये लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांनी केली. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.