corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 16, 2020

echo adrotate_group(3);

एकाच दवाखान्याच्या संपर्कातून 10 जणांना लागण

बीड जिल्हा : गुरूवारी 15 पॉझिटिव्हecho adrotate_group(6);

बीड, दि. 16 : बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 15 जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. यातील गेवराईचा एक रुग्ण औरंगाबाद येथे उपचारादरम्यान पॉझिटिव्ह आढळून आला आहे.कालपर्यंत बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 262 होती. आज त्यात 15 जणांची भर पडली असून आता एकूण रुग्णसंख्या 277 झाली आहे. त्यात 12 जण मृत झाले आहेत. (प्रशासकीय आकडेवारीनुसार मृतांची संख्या 9 आहे) तर 143 कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 122 आहे (आताचे धरून).

कुठल्या तालुक्यात आढळले पॉझिटिव्ह?केज तालुका, 2, बीड तालुका 10, गेवराई तालुका 2, परळी 1echo adrotate_group(8);

बीड तालुक्यातील एका खाजगी दवाखान्याच्या संपर्कातून 22,27,31, 26, 30, 48, 28 वयोगटातील महिला व 22, 24, 22 वयोगटातील पुरुष पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.गेवराईतील माऊली नगर भागातील 60 वर्षीय महिला व मोटे गल्लीतील 64 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळले आहेत. पैकी पुुरुष औरंगाबादेत उपचार घेत आहे.परळीतील सर्वेश्वर नगर येथील 48 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आढळला आहे.echo adrotate_group(9);

केजच्या नांदूरघाटच्या मृतांच्या कुटंबियाचा रिपोर्ट पॉझिटिव्हनांदूरघाट : केज तालुक्यातील नांदूरघाट येथील एकास कोरोनाच्या संशयावरून अंबाजोगाईच्या स्वारातिमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मृत्यूपश्चात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आज त्याच कुटुंबातील 51 वर्षीय व 14 वर्षीय दोन सदस्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नांदूरघाटमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मृत व्यक्तीचा निगेटिव्ह आणि कुटुंबियातील इतरांचा पॉझिटिव्ह कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबधित बातम्या

सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

तब्बल 19 पॉझिटिव्ह

echo adrotate_group(10);