कोरोना अपडेट

महामारीचे शतकी दुष्टचक्र

By Karyarambh Team

July 17, 2020

echo adrotate_group(3);

दर 100 वर्षांनी नवी जीवघेणी महामारी अवतरते भूतलावर

बीड : कोरोना या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. जगाला या महामारीने वेठीस धरले आहे. तब्बल 213 देश या कोविड-19 विषाणूच्या अजगरी विळख्यात सापडले आहेत. भारतात 10 लाखांचा टप्पा कोरोनाग्रस्तांनी नुकताच पार केला आहे. आपण जरी या महामारीने गा्रसले गेलो असलो तरी, हे महामारीचे दुष्टचक्र काही पृथ्वीला नवे नाही. गेली चार शतकं पृथ्वी एक नवी महामारी, लाखो रूग्ण आणि लाखो जीव जाताना बघत आहे. दर शंभर वर्षानी हे दुष्टचक्र येत असल्याचे दिसते.echo adrotate_group(7);

1720, 1820, 1920 सालांमध्ये आलेल्या महामारीनंतर आता 2020 मध्येही कोरोनासारख्या प्राणघातक महामारीने गेल्या चार महिन्यांपासून थैमान घातले आहे. दर शंभर वर्षांनी ही महामारी भूतलावर कसे मृत्यूचे तांडव करीत असते, यावर टाकलेला दृष्टिक्षेप.echo adrotate_group(8);

प्लेग 1720प्लेगच्या साथीने 1720 मध्ये जगभरातील लाखो नागरिकांचा बळी घेतला होता. फ्रान्समधील मार्सिले शहरातून आलेल्या प्लेगमुळे एक लाख म्हणजे त्या काळातील जवळपास 20 टक्के जनतेला आपले प्राण गमवावे लागले होते. उंदीर आणि पिसांपासून या प्लेगच्या साथीचा फैलाव झाला होता. या महामारीची जनतेत इतकी दहशत होती की रात्री तंदुरुस्त झोपलेला व्यक्ती सकाळी मरण पावलेला असायचा. इतिहासकारांनी प्लेगमुळे युरोप, आफ्रिका व आशिया उपखंडात 7 कोटी लोकांचा बळी गेल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हिंदुस्थानमध्ये तर या साथीचा प्रकोप 19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत होता व त्यात लाखो लोकांचा अंत झाला होता.echo adrotate_group(9);

कॉलरा 1820प्लेगच्या बरोबर साथीनंतर शंभर वर्षांनी म्हणजे 1820 मध्ये कॉलरा या महामारीने जगभरात थैमान घातले. ही कॉलराची साथ सर्वप्रथम थायलंड, इंडोनेशिया व फिलिपिन्समध्ये आगीसारखी पसरली. कॉलरा रोगाचा हिंदुस्थानसह मध्य पूर्व, आफ्रिका, पूर्व युरोप व रशियामध्ये फैलाव झाला होता. यामुळे जवळपास 8 लाख लोक मरण पावले होते. कॉलराच्या साथीत उलटी आणि जुलाबाने माणूस गर्भगळीत व्हायचा अन् त्यातच त्याचा अंत व्हायचा.

स्पॅनिश फ्लू 1920कॉलराच्या प्रकोपानंतर बरोबर शंभर वर्षांनी म्हणजे 1920 मध्ये स्पॅनिश फ्लूचा जगावर हल्ला झाला. या महामारीने जगातील एक तृतीयांश जनतेला आपला जीव गमवावा लागला. स्पॅनिश फ्लूने युरोप, युनायटेड स्टेट्स व आशियातील काही देशांना सर्वप्रथम विळखा घातला. या फ्लूने 2 ते 5 कोटी नागरिकांचा बळी घेतला. हा विषाणू एच1एन1 फ्लू होता. खोकला अन् शिंकेतून त्याचा संसर्ग होत असल्याने स्पॅनिश फ्लू पसरला होता. हिंदुस्तानात 2 कोटी लोक स्पॅनिश फ्लूचे शिकार झाले. मात्र त्या महामारीने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केल्याने त्याला स्पॅनिश फ्लू हे नाव देण्यात आले.

कोरोना 2020 स्पॅनिश फ्लू नंतर आता 100 वर्षांनी कोरोना महामारीने जगाला वेठीस धरले आहे. चीनच्या वूहान प्रांत या महामारीचे जन्मस्थान ठरला. या महामारीचा फटका अमेरिकेला सर्वाधिक बसला असून, यात 40 लाख अमेरिकन नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. ताप, खोकला अन् घशात त्रास होऊन श्वसन प्रक्रियेवर प्रतिकुल परिणाम होणे ही कोरोनाची लक्षणे आहेत. तर भारत कोरोना रुग्णांच्या बाबतीत जगात 3 र्‍या क्रमांकावर आहे.echo adrotate_group(10);