deadbody

कोरोना अपडेट

बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

By Karyarambh Team

July 19, 2020

बीड, दि. 19 : बीडमध्ये आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. शहरातील लोटस हॉस्पिटलच्या संपर्कातून हा रुग्ण कोरोनाग्रस्त झाला होता. कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या रुग्णाला औरंगाबादला उपचारासाठी हलविण्यात आले होते. तेथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्या रुग्णाचे रविवारी सकाळी निधन झाले.

शहरातील राजीवनगर भागातील हा रुग्ण लोटस हॉस्पीटलमध्ये दाखल होता. त्याला तेथे उपचार सुरु असताना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. होते. त्याच्यासोबतच हॉस्पिटलमधील इतर 10 जणांनाही कोरोनाची लागण झालेली होती. बीडमधील मृत्यूची संख्या आता 13 झाली आहे.