corona vaccine

हैद्राबादमध्ये कोवॅक्सीनच्या मानवी चाचणीला सुरवात

कोरोना अपडेट देश विदेश न्यूज ऑफ द डे

सोमवारी नुकताच भारताने 11 लाख कोरोनाग्रस्तांचा आकडा पार केला आहे

हैद्राबाद: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. कोरोनावरील लस मिळावी यासाठी सर्व शास्त्रज्ञ जीवाचे रान करत आहेत. कोरोना रोजच वेगवेगळे रेकॉर्ड करताना दिसत आहे.

निझाम्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैद्राबाद, इथे कोवॅक्सिन या लसीच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. ज्या 2 स्वयंसेवकांवर हि चाचणी केली गेली आहे त्यांच्या तब्येतीवर पुढील 6 महिने लक्ष ठेवले जाणार आहे. डॉक्टरांनी सांगितले की, स्वयंसेवकांमध्ये अ‍ॅन्टीबॉडीज तयार होतात की नाही, अ‍ॅन्टीबॉडीज शरीरात किती काळ टिकतात, याकडे लक्ष असेल.  दुसरा डोस त्यांना 14 दिवसांनंतर दिला जाईल. 

कोविडच्या लसीच्या चाचणीमध्ये समाविष्ट असणारे एनआयएमएस हे 12 पैकी एक हॉस्पिटल आहे. डॉक्टर प्रभाकर रेड्डी हे येथील कोवॅक्सिन मानवी चाचणीचे मुख्य अधिकारी आहेत.
क्लिनिकल फार्माकोलॉजीच्या एनआयएमएस विभागातील प्राध्यापक आणि ज्येष्ठ रहिवाशांव्यतिरिक्त, क्लिनिकल चाचण्यांमध्ये जनरल मेडिसिन, अ‍ॅनेस्थेसिया आणि श्वसनासंबंधी औषधांचे डॉक्टर देखील सामील आहेत.

दरम्यान, सोमवारी भारताने 11 लाखांचा टप्पा पार केला आहे. एका दिवसात 40,425 कोरोनाग्रस्त आढळण्याची हि पहिलीच वेळ आहे. जरी बरे होणार्‍याची संख्या 7 लाखांच्या वर गेलेली असली तरी रोज नवीन रूग्ण सापडण्याचे प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे.

Tagged