rain

कोरोना अपडेट

सहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी

By Karyarambh Team

July 21, 2020

बीड : बीड महसूल मंडळासह तालुक्यातील पेंडगाव, पिंपळनेर, म्हाळस जवळ्यासह वडवणी आणि कौडगाव मंडळात अतिवृष्टी rainfall झाल्याची नोंद झाली आहे.

   जिल्ह्यात सोमवारी (दि.20) रात्रीपासून कमी-अधीक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. रात्रीतून जिल्ह्यात एकूण 21.30 मि.मी.तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत  52.65 टक्के पावसाची नोंद झाली आहे. बीड तालुक्यातील म्हाळस जवळा मंडळात विक्रमी 155 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. याशिवाय पिंपळनेर मंडळात 142, बीड महसूल मंडळात 100 तर पेंडगाव मंडळात 85 मिलीमीटर पाऊस पडला आहे. वडवणी मंडळात 80 तर कौडगाव मंडळात 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 65 मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस अतिवृष्टी गणला जातो.

तालुकानिहाय पाऊस (आकडे मिलीमीटरमध्ये) : बीड-56, गेवराई-34.6, शिरूर-22, वडवणी-79, अंबाजोगाई-30.8, माजलगाव 48.7, केज-9.3, धारूर 16.3, परळी 19, पाटोदा 3.5, आष्टी 3.1