covid 19

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कोरोनाच्या मीटरने पकडली 50 ची स्पीड

By Karyarambh Team

July 21, 2020

बीड, दि. 21 : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आता वरचेवर बिघडत चालली आहे. 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात 381 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील आठ दिवसांपासून आकडेवारीत झपाट्याने वाढ होत असून आता तर दिवसागणिक 50 जण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. सोमवारी (दि.20 जुलै) सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता आलेल्या अहवालातही तब्बल 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकाच दिवसात 50 जणांची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून नोंद झाली. 1 जुलै ते 20 जुलै या 20 दिवसात तब्बल 235 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. भारतात लॉकडाऊन लागल्यानंतर सर्वात आधी आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे पहिल्याच लॉकडाऊनमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सुमारे दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आणि गेवराई तालुक्यातील ईटकूर आणि माजलगाव तालुक्यातील हिवरा येथे 20 मे रोजी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले. तेव्हापासून दररोज एक-दोन रुग्ण कुठे न कुठे आढळून येण्याचा नित्यक्रम सुरुच आहे. जून संपेपर्यंत बीड जिल्ह्यात 146 रुग्णांची नोंद झाली होती. त्यात बाहेर जिल्ह्यातील काही रुग्णांनीही बीडमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर 1 जुलै ते 20 जुलै या 20 दिवसात तब्बल 235 रुग्ण आढळून आले. अजुनही महिन्याचे अकरा दिवस शिल्लक आहेत.

बड्या नेत्यांनाही पडला होता विळखाकोरोनाने आजपर्यंत बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांनाही विळखा घातला. त्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होता. अंबाजोगाईच्या वरीष्ठ महिला अधिकारी, माजलगाव, केज नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही कोरोनाची लागण झाली. पोलीस अधीक्षकांच्या शासकीय बंगल्यातील सुरक्षा रक्षक, माजलगाव ग्रामीण व बीड ग्रामीण ठाण्यात आरोपी कोरोनाग्रस्त सापडल्याने हे दोन्ही ठाणे, याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी आणि पोलीस अधीक्षकांनाही क्वारंटाईन व्हावं लागले आहे.

आतापर्यंतचे मृत्यूजिल्ह्यात आतापर्यंत 18 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यात आज मृत्यू झालेल्या जिल्हा रुग्णालयातील एका 40 वर्षीय अधिपरिचारिका आणि एका 62 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

174 जणांना डिस्जार्चजिल्ह्यात नोंद असलेल्या 381 रुग्णांपैकी कालपर्यंत (20 जुलै) 174 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 189 जणांवर उपचार सुरु आहेत.

असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै -032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – 0011 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 24 (सकाळी 9 : 45)20 जुलै – 26 (रात्री 11 : 00)