राम मंदिर

देश विदेश

पहले सरकार फिर मंदिर अशी शिवसेनेची स्थिती

By Karyarambh Team

July 21, 2020

आयोध्येला जायला शिवसेनेला राष्ट्रवादीचे प्रमाणपत्र लागेल; रावसाहेब दानवेंची उध्दव ठाकरेंवर टिका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीेच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी उध्दव ठाकरे जाणार की नाही यावर खूप चर्चा रंगली आहे. अनेक राजकीय पक्ष ठाकरेंवर टिका करून आपली पोळी भाजून घेत आहेत.दरम्यान, संजय राऊत यांनी शिवसेनेला आयोध्येला जाण्यासाठी कोणाच्या आमंत्रणाची गरज नसल्याचे म्हटले आहे. तर यावरच रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचं पहले मंदिर फिर सरकार असं आधी होतं आता पहले सरकार फिर मंदिर असं झालं आहे असे उद्गार काढले आहेत.

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. मात्र, शिवसेनेला आयोध्येला जाण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमाणपत्र लागेल अशी टिका रावसाहेब दानवे यांनी केली आहे.