कोरोना अपडेट

कोरोनामुळे गेवराईच्या महिलेचा मृत्यू

By Karyarambh Team

July 22, 2020

बीड : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांचा आणि मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. कोरोनामुळे आणखी एका व्यक्तीचा बळी गेला असून मृत्यू संख्या २० झाली आहे.

    गेवराई शहरातील गजानन नगर येथील ६७ वर्षीय महिला जिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये उपचार घेत असताना आज (दि.२२) सकाळी मृत्यू झाला आहे. त्यांना रुग्णालयात ६ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ४ दिवसापूर्वी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, दरदिवशी मृत्यू होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.