whatsup msg

अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर प्रकल्प अधिकार्‍याने टाकला स्वतःचा नग्न फोटो

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड  :  महिला बालविकास प्रकल्प अधिकार्‍याने चक्क महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा नग्न फोटो पोस्ट केला. या प्रकारामुळे अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बीड शहरातील ही घटना असून बुधवारी हा धक्कादायक प्रकार समोर आला.

या अधिकार्‍याने आंघोळ करतानाचा स्वतःचा चक्क नग्न फोटो ‘बीड आयसीडीएस अर्बन’ नावाच्या फक्त महिलांच्या ग्रुपवर टाकला आहे. या प्रकारामुळे अनेक महिला ग्रुपमधून बाहेर पडल्या. तर या प्रकारामुळे काही महिलांच्या घरी भांडणही झाली. अंगणवाडी महिलाच्या ग्रुपवर असेही प्रकार चालतात काय, असं काही महिलांना त्यांच्या पतीनं सुनावल्याची माहिती समोर आली आहे. त्या अधिकार्‍याच्या बेशरमपणामुळे महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पूर्वीही या अधिकार्‍यानं त्याचे प्रायव्हेट फोटो ग्रुपवर शेअर केल्याची तक्रार महिलांनी केली होती. या अधिकार्‍यावर कारवाई करा, अशी मागणी महिलांनी केली आहे. काम करताना सतत त्रास देत असल्याचा महिलांनी आरोप केला आहे. अशा भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान, माझा मोबाइल हॅक करून कोणीतरी आंघोळ करतानाचा फोटो ग्रुपवर टाकून बदनामी केल्याच्या बनाव त्या अधिकार्‍यानं केला आहे. मात्र, या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आणि महिला आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकार्‍याविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Tagged