केज

5 दुकानात चोरी; रोख रक्कम लंपास

By Karyarambh Team

July 24, 2020

केज : तालुक्यातील आडस येथे मध्यरात्री शिवाजी चौक परिसरातील पाच दुकानाचे शटर वाकवून अज्ञात चोरांनी चोरी करून रोख रक्कम केली लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

  ग्रामस्थांच्या माहितीनुसार, डॉ.विक्रमसिंह पवार यांचे मेडिकल, सत्यनारायण माने यांचे किराणा दुकान, विश्वनाथ गव्हाणे यांचे हार्डवेअर, विलास तरकसबंद यांचे ज्वेलर्स तर परमेश्वर भोसले यांच्या कृषी सेवा केंद्रात चोरी झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना देताच धारुर पोलीस ठाण्याचे सपोनि.सुरेखा धस यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी सकाळी सात वाजता दाखल झाले होते. पंचनाम करण्याची प्रक्रिया सुरु असून ठसे तज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.