सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्याकेल्याचा नातेवाईकांचा आरोप
बीड : सासरच्या मंडळीकडून होणार्या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंंगळवारी (दि.28) सकाळी चकलंबा पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
रेखा भद्रीनाथ तळेकर (वय 23 रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर (वय 3) अशी मयताची नावे आहेत. रेखा यांचा पाच वर्षापूर्वी भद्रीनाथ तळेकर यांच्याशी विवाह झाला होता. पतीसह सासरच्या मंडळीकडून होणार्या सततच्या त्रासाला कंटाळून रेखा यांनी तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. असा आरोपी माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. पतीसह सासरचे मंडळी फरार असून घटनास्थळी चकलंबा पोलीस ठाण्याचे सपोनि.देशमुख, पोउपनि.दिंगाबर पवार, बप्पासाहेब झिंजुर्डे, सफौ.थोरात, नागरे, खेडकर, दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.