देश विदेश

राफेल संकटातून वाचले

By Keshav Kadam

July 29, 2020

राफेल उभे असलेल्या तळावर इराणचे 2 क्षेपणास्त्र

बीड :  आज पाच राफेल लढाऊ विमान सात हजार किमीचा प्रवास भारतात दुपारी दाखल होणार होती. मात्र सकाळी युएईच्या अल-दफ्रा एअर बेसवर भारताची राफेल विमान उभी असलेल्या ठिकाणी इराणचे दोेन क्षेपणास्त्र पडल्यामुळं खळबळ उडाली. परंतु या क्षेपणास्त्रामुळं भारताच्या राफेलचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

       भारताच्या लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी 36 राफेल खरेदी करण्यासाठी चार वर्षापुर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटींचा करार केला होता. आज त्यातील पाच राफेल विमान भारतात अंबाला मिलिटरी बेसवर दुपारी दाखल होणार होती. यामुळे या परिसरात कलम 144 लागू करण्यात आल होता. तसेच फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली होती. मात्र पहिली तुकडी दाखल होण्यापुर्वीच सकाळी युएईच्या अल-दफ्रा एअर बेसवर भारताची राफेल विमान उभी असलेल्या ठिकाणी इराणचे दोेन क्षेपणास्त्र पडल्यामुळं खळबळ उडाली. परंतु या क्षेपणास्त्रामुळं भारताच्या राफेलचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.