क्राईम

पुलावरुन आलेल्या पाण्यात दोघे वाहून गेले

By Keshav Kadam

July 29, 2020

पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथील घटना

पैठण  :  पैठण तालुक्यातील पैठणखेडा परिसरात बुधवारी दमदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी गावातील पुलावरून पाणी वाहत असताना पुलावर गेलेले दोन तरुण पाण्यात वाहून गेले. महिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि.राजेंद्र बनसोड आपल्या पथकासह तातडीने बचावकार्यासाठी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करण्यासाठी अडचणी येत असल्याने पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा गुरुवारी सकाळी शोध घेण्यात येणार आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील पैठणखेडा येथे बुधवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. यामुळे गावामध्ये येण्या-जाण्यासाठी असलेल्या ईधाटे पुलावरून पावसाचं पाणी वाहत होते. यावेळी अशोक परसराम हुले (वय 18) यांची बहिण बाहेर गावावरुन आली होती. बहिणीला फुलावरून आणण्यासाठी अशोक जात असताना पुराच्या पाण्यात तोल गेल्याने पडले अन वाहून जावू लागले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेला काळू कैलास नवले (वय 19 रा.पैठणखेडा) यांनी अशोकला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही पाण्यात वाहून गेले. या घटनेने गावामध्ये हळहळ व्यक्त होत असून घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिस ठाण्याचे सपोनि.राजेंद्र बनसोड यांनी विशेष पथक पैठणखेडा गावामध्ये बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे. मात्र रात्रीच्या वेळेस बचाव कार्य करण्यासाठी अडचणी येत असल्याने वाहून गेलेल्या तरुणाचा शोध आज सकाळी अग्निशामक दलाच्या जवानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे.