Corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कोरानाची घौडदोड कायम, आजही 58 पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

July 29, 2020

बीड, दि.29 : बीड जिल्ह्यातील कोरोनाची सुरु असलेली घौडदोड कायम आहे. बुधवारीही तब्बल 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 701 इतकी झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे

गेवराई शहर पुढील आठ दिवसासाठी बंदबीड – कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गेवराई शहरात पुढील आठ दिवसांसाठी म्हणजेच 6 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत.गेवराई शहरात दररोज नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अवघड झाल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. बंदबाबतचे यापुर्वीचे सर्व नियमही गेवराई शहरासाठी लागू करण्यात आले आहेत.

बीड जिल्हा कोरोना अपडेट

एकूण रुग्ण – 701 मृत्यू झालेले रुग्ण – 27 डिस्चार्ज – 313 उपचार- 361

जुलै महिन्यात असे आढळले आहेत दिवसागणिक रुग्ण

1 जुलै – 032 जुलै – 043 जुलै – 024 जुलै – 095 जुलै – 066 जुलै – 037 जुलै – 138 जुलै – 179 जुलै – 0610 जुलै – 0011 जुलै – 2012 जुलै – 0913 जुलै – 0414 जुलै – 0516 जुलै – 1517 जुलै – 2518 जुलै – 1119 जुलै – 1420 जुलै – 50 (सकाळी 9ः45- 24), (रात्री 11ः00 –26)21 जुलै – निरंक22 जुलै – 44 (रात्री 1:00)23 जुलै – 27 (रात्री 1:00)24 जुलै – निरंक25 जुलै – 69 (रात्री 1:30- 37), (दुपारी 12ः00- 7 ),(रात्री 11ः30- 25)26 जुलै – निरंक27 जुलै – 66 (रात्री 12:50- 34), (रात्री 9:15 – 32)28 जुलै – 3729 जुलै – 58