atyachar

कोरोना अपडेट

अमरावतीत विकृती : चक्क तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब

By Karyarambh Team

July 30, 2020

echo adrotate_group(3);

अमरावती, दि.30 : तळपायाची आग मस्तकाला जाईल, असा संतापजनक प्रकार अमरावतीत घडला. कोरोनाबाधीताच्या संपर्कात आलेल्या एका तरुणीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून तरुणीला पुन्हा एकदा स्वॅब देण्यास बोलावून घेतले. आणि चक्क तिच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचे खळबळजनक कृत्य लॅब टेक्निशियनने केले. संबंधीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात बलात्कार, अ‍ॅट्रॉसिटी आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.अल्पेश अशोक देशमुख (वय 30) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित तरुणी अमरावतीमध्ये भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे 28 जुलै रोजी ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये त्याच्या संपर्कातील 20 जणांचे स्वॅब घेण्यात आले. मात्र स्वॅब घेणार्‍या अल्पेश देशमुखने तक्रारदार तरुणीला परत बोलावलं आणि तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून युरिनल तपासणी करावी लागेल, असं सांगितले.ही बाब तरुणीने वरिष्ठ महिला सहकार्‍याला कळवली. त्या दोघींनी महिला टेक्निशिअन नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्पेश देशमुखने महिला टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. तसंच तपासणीसाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असंही म्हटलं. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले. इतकंच नाहीतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचंही सांगितलं.योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीला शंका आली आणि तिने ही बाब भावाला सांगितली. त्याने डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी अशाप्रकारे कोरोनाची चाचणी करत नसल्याचं सांगितलं. यानंतर तरुणीच्या तक्रारीवरुन अल्पेश देशमुख याच्याविरोधात बडनेरा पोलिसांनी विविध कलमांसह गुन्ह्याची नोंद केली.echo adrotate_group(6);

अशाप्रकारे स्वॅब घेणं हा अत्याचार : जिल्हाधिकारीकोरोनाच्या चाचणीसाठी अशाप्रकारे स्वॅब घेतला जात नाही. हा अत्याचार आहे. याप्रकरणी लॅब टेक्निशियनविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.echo adrotate_group(8); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);