amar-singh

राज्यसभा खासदार अमर सिंग यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन

देश विदेश न्यूज ऑफ द डे राजकारण

सिंगापूरमध्ये घेतला अखेरचा श्वास

दिल्ली ः राज्यसभा खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाल्याची घटना घडली आहे. वयाच्या 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.


अमर सिंग हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखलं जायचं.


अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्याशीही त्यांचे घनिष्ठ संबंध होते. परंतु काही वर्षांपूर्वा या दोघांपासूनही अमर सिंग दुरावले होते. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अमर सिंग यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची.

Tagged