serum institute visite to sharad pawar

कोरोना अपडेट

शरद पवारांची अचानक सिरम इस्टिट्यूटला भेट

By Karyarambh Team

August 01, 2020

आ.अमरसिंह पंडितही होते सोबत

पुणे, दि.1 : कोरोनाच्या लस निर्मितीवरून चर्चेत आलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला अचानक शरद पवार यांनी शनिवारी सकाळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत आ.सतीश चव्हाण, माजी आ.अमरसिंह पंडित, जयसिंह पंडित उपस्थित होते.शरद पवार यांनी सुरुवातीला गोवर्धन डेअरी फार्माला भेट दिली. त्यानंतर ते भाग्यलक्ष्मी डेअरीलाही भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. सायरस पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूट आणि इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कोरोना लशीबाबत झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर पवारांच्या भेटीला महत्व आहे.ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आता आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार आहे. ऑक्सफर्डची लस सक्सेस झाली तर जगभरात पुरवठा करता येईल, तेवढ्या क्षमतेनं सिरम लसीची निर्मिती करणार आहे.अमरसिंह पंडित म्हणतात…सिरम इन्स्टिट्यूट, हडपसर, पुणे या जागतिक दर्जाची लस उत्पादन करणार्‍या कंपनीला भेट देण्याचा योग केवळ साहेबांमुळे आला. आमचे नेते मा.खा.श्री. शरद पवार साहेब यांचे सोबत अनेक देश-विदेशात अभ्यास दौरे केले. कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर आजची सिरम इन्स्टिट्यूटची भेट माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरली. यावेळी माझे सहकारी आ. सतीश चव्हाण, जयसिंग पंडित, उद्योजक अनंत काळकुटे हे उपस्थित होते.भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर दैदिप्यमान करण्याचे काम सिरम इन्स्टिट्यूट करत आहे. जगातील सुमारे 170 देशांना वेगवेगळ्या रोगावरील लसींचा पुरवठा करण्याचे काम सिरम कडून सुरू आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण लसी पैकी सुमारे 80% लसींचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट मध्ये सुरू आहे, याविषयी माहिती ऐकतांना उर भरून येत होता.कोविड-19 च्या अनुषंगाने सिरम इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनाची माहिती व आढावा मा.खा.श्री. शरद पवार साहेबांनी घेतला. जागतिक पातळीवर जे-जे संशोधन कोरोनाच्या संदर्भात सुरू आहे, त्या प्रत्येक बाबींचा संबंध सिरम इन्स्टिट्यूट सोबत आहे. सिरम कडून मोठे दर्जेदार काम या क्षेत्रात सुरू आहे. जागतिक पातळीवर कोविड संदर्भात संशोधीत केलेल्या आणि मान्यतेच्या चाचण्या सुरू असलेल्या लसींचे उत्पादन सिरम इन्स्टिट्यूट करणार आहे, ऑक्सफर्ड सह अनेक संस्थांच्या बरोबर तसे करार सिरमने केले आहेत, ही बाब आपणा सर्वांसाठी भूषणावह आहे. कोविडच्या संदर्भातील संशोधन अंतिम टप्प्यात असून लवकरच लस उत्पादन सुरू होऊ शकते अशी माहिती सुद्धा सिरामच्या वतीने देण्यात आली. कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी सुद्धा सिरम इन्स्टिट्यूट काही औषधी निर्माण करत आहे.एकंदरीत आजचे चित्र आशावादी आहे, सन्मानीय साहेबांनी सिरम इन्स्टिट्यूट मधील शास्त्रज्ञ, संशोधक, संचालक, अधिकारी यांचेशी विस्तृत चर्चा केली, त्यांना मार्गदर्शन आणि सूचना केल्या.या दौर्‍यात माननीय साहेबांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. सिरम इन्स्टिट्यूट सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देता आली, हे केवळ साहेबांमुळे शक्य झाले आहे.