कोरोना अपडेट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

By Karyarambh Team

August 02, 2020

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करुन ही माहिती दिली.

  ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले की, सुरुवातीस मला कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे स्वॅब दिला असता टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत ठीक आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहे. दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःहून क्वारंटाईन होण्याची विनंती देखील त्यांनी ट्वीटमध्ये केली आहे.