क्राईम

हॉटेलमध्ये बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची महिला पोलीस अधिकाऱ्यास अरेरावी

By Keshav Kadam

August 03, 2020

बीड : रात्रीच्या वेळी सुरू असलेले हॉटेल (खानावळ) बंद करण्यास सांगितल्या नंतर हॉटेलमध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत घातली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप गिराम असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमणुकीस असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री 12 च्या सुमारास शहरातील जालना रोडवरील एक हॉटेल सुरू होते. याची माहिती शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या मपोउपनि. मिना तुपे त्याठिकाणी पोहचल्या. हॉटेल मालकाला हॉटेल बंद करण्याचे सांगितले. यावेळी त्याठिकाणी असलेला पोलीस कर्मचारी संदीप गिराम याने ‘काय करायचं ते करा’ हॉटेल बंद करत नाही, मला काय शिक्षा होयची ती होऊ दे अस म्हणत हुज्जत घातली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.