करिअर

बीडचा डॉ प्रसन्न लोध बनला आयपीएस

By Karyarambh Team

August 04, 2020

echo adrotate_group(3);

आईचे कष्ट आणि पत्नीची साथ याने झाली यशप्राप्ती

बीड: एका यशस्वी पुरूषामागे स्त्री असते असे नेहमी बोलले जाते. मात्र अतुलनीय यशप्राप्तीसाठी पुरूषाच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर येणार्‍या स्त्रीया खूप गरजेच्या असतात याचे उत्तम उदाहरण डॉ प्रसन्न लोध. युपीएससी चा निकाल लागला आणि बीड जिल्ह्यातील प्रसन्न लोध देशातून ओबीसी कॅटेगरीमधून 524 रँक घेऊन आय पी एस झाला. महाराष्ट्रासाठी आता तो त्याची कर्तव्य बजावेल. मात्र, या यशामागचे कष्ट खूप आहेत. यात त्याचे आई वडिल आणि पत्नीचा वाटा मोलाचा आहे.echo adrotate_group(6);

रामेश्वर आणि मीनाक्षी लोध दोघेही स्टेनोग्राफर. संसार करताना होणारी ओढाताण आणि नोकरी सांभाळून मुलांना घडवण्याची जिद्द याने आज मीनाक्षी व रामेश्वर सिंह लोध यांची तिन्ही मुले डॉक्टर आहेत. त्यातील प्रसन्न हा मधला मुलगा. पुनम हि मोठी मुलगी आणि धाकटा प्रीतमही डॉक्टर. प्रसन्नचे 12 वी पर्यंतचे शिक्षण बीड येथेच झालेले. बलभीम कॉलेज मधून 12 वी करणार्‍या प्रसन्नला सीइटी मध्ये तिसरा क्रमांक मिळाला. echo adrotate_group(8);

डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगलेला प्रसन्न, आपल्या स्वप्नाच्या आकाशाला गवसणी घालायला घर सोडून बाहेर पडला. जेजे हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून कर्तव्य बजावताना, प्रसन्न आणि अनुराधाचे लग्न झाले. स्वतः एक स्त्रीरोग तज्ज्ञ असूनही, नवर्‍यातील गुण ओळखून अनुराधा यांनी प्रसन्न ला युपीएससी देण्यासाठी प्रोत्साहित केले. या मागे तिची मेहनत आणि प्रोत्साहन खूप आहे हे सांगताना, मीनाक्षी लोध यांचा उर सुनेसाठी देखील अभिमानाने भरून आला.echo adrotate_group(9);

आई स्वयंपाक करता करता प्रसन्नला गणिते शिकवत असे…

प्रसन्न लहानपणीपासूनच शांत आणि हुशार होता. घरात टीव्ही सुद्धा मुलं 8 वीत गेल्यापासून बंद होता हे सांगताना प्रसन्न चे वडील कष्टाचे सार्थक झाले या भावनेने भरून पावले होते.दोघे स्टेनोग्राफर असताना, सरकारी कामात सर्वेक्षण, इतर काम याने मुलांना वेळ देता येत नसे. त्यामुळे आई स्वयंपाक करता करता प्रसन्नला गणिते शिकवत असे. असाच अभ्यास सुरू असताना प्रसन्नने स्वतःमधील चमक दाखवून दिली.

सकाळी 11 वाजता आईला फोन सकाळी 11 वाजता मीनाक्षी लोध या जिल्हापरिषद मध्ये कर्तव्य बजावत असताना प्रसन्नने आईला फोन केला आणि ही आनंदाची बातमी दिली. आईला प्रचंड आनंद झाला. प्रसन्न आता प्रवासात आहे. थोड्याच वेळात येईल हे सांगताना त्यांना खूप आनंद झाला होता. मीनाक्षी यांना डायबेटिस आहे आणि डोळ्यांनी धूसर दिसते. प्रसन्नचे वडिल घरकामात लक्ष देतात असे मीनाक्षी यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील मंदार पत्की आणि वैभव वाघमारे यांना देखील घवघवीत यश प्राप्त झाले आहे. खर्‍या अर्थाने बीड जिल्ह्याने युपीएससी मध्ये डंका वाजवला आहे.

वैभव वाघमारे हा 2017 मध्ये पुण्यातून सी ओ इ पी कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनियर झाला. “10 पासून पाहिलेले स्वप्न पूर्ण करायचे. युपीएस सी करायची असे ठरवले. 2018 मध्ये 24 मार्क कमी पडले आणि आता 771 वी रँक आली आहे.” असे वैभव ने कार्यारंभशी बोलताना सांगितले. echo adrotate_group(1);