कोरोना अपडेट

बीड जिल्हा : कोरोना हजारच्या पार

By Karyarambh Team

August 04, 2020

बीड, दि.4 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच चालले आहेत. मंगळवारी आलेल्या रिपोर्टमध्ये तब्बल 75 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या आता 1037 झाली आहे. आतापर्यत 38 जण मयत असून 493 रुग्ण बरे झाले आहेत. आजच्या रिपोर्टमध्ये एकाचा स्वॅब अनिर्णित आहे. तर 392 जण निगेटिव्ह आल्याने त्यांना मोठा दिलासा आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बीड 27, परळी 14, अंबाजोगाई 4, केज 17, गेवराई 7, माजलगाव 1, धारूर 2, पाटोदा 1, आष्टी 2 असे तालुकानिहाय रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.पॉझिटिव्ह रिपोर्ट खालील प्रमाणे