Site icon कार्यारंभ लाईव्ह

अंमळनेर अनिश्चित काळासाठी बंद

echo adrotate_group(3);

अंमळनेर : पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे एका वैद्यकीय सेवा करणार्‍या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने अंमळनेरसह परिसर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. दरम्यान या डॉक्टरांच्या संपर्कात  असलेल्या अतिजवळच्या 11 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने अंमळनेकरांना दिलासा मिळाला आहे.echo adrotate_group(6);

 3 ऑगष्ट रोजी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर तातडीने उपचारासाठी बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदरील रुग्ण वैद्यकीय सेवा करीत असल्याने त्यांचा संपर्कात किती रुग्ण आलेत, हे तपासणीसाठी अंमळनेर प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे हे आपल्या टिमसह कार्यरत आहेत. संध्या पुर्ण गाव बंद करण्यात आले. अंमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि.श्यामकुमार डोंगरे त्यांच्या फौजफाट्यासह कडक बंदोबस्तासाठी सज्ज असून भडकेल रस्ता ते खडीक्रेशर व रयत शाळेकडे जाणार्‍या मार्गावर बॅरिकेट टाकुन रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोणीही आपल्या घराबाहेर पडु नये, पडल्यास कठोर कार्यवाहीला सामोरे जावे लागेल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. आजपासून घरोघरी जाऊन आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण तांदळे, अंमळनेर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी परमेश्वर बडे, खरमाटे, तलाठी वारंगुळे, सरपंच उद्धव पवार हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. पाटोद्याचे तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी तालुक्यात कंटेनमेंट झोन असलेल्या अंमळनेर, म्हस्के वस्ती, महेंद्रवाडी आदि ठिकाणी भेटी देऊन पहाणी करीत कर्मचार्‍यांना योग्य सूचना दिल्या, दरम्यान कंटेनमेंट झोनमधील नागरिकांनी बाहेर न पडता घरातच थांबुन शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन केले आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(1);echo adrotate_group(9);

Exit mobile version