shivaji-nilangekar-and-anil

आज महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे निधन

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

नगर, लातूर, दि.5 : महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांचे आज सकाळी निधन झाले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पहाटे पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते. निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते पुण्यात होते. आज सकाळी त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.


तर दुसरीकडे नगर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी राज्यमंत्री शिवसेनेचे उपनेते, आणि माजी आमदार अनिल राठोड यांचे आज (5 ऑगस्ट) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिल राठोड यांनी प्रकृती बरी नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना आज पहाटे 5:30 वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले.

अनिल राठोड हे 25 वर्ष अहमदनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. इतकेच नाही तर युतीच्या काळात त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश करण्यात आला होता.

Tagged