न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई एसडीओंच्या बदलीची शिफारस

By Karyarambh Team

August 05, 2020

बीड : लाच कशी घ्यायची हे एसडीओच शिकवित असल्याची गंभीर तक्रार अंबाजोगाईच्या निलंबित तलाठी सचिन केंद्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. तक्रार अर्जाची चौकशी होईपर्यंत उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची इतरत्र बदली करण्याची शिफारस जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

 तक्रारदार निलंबित तलाठी सचिन केंद्रे यांनी एक व्हिडीओ ज्यामध्ये अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव ह्या लाच कशी घ्यायची हे शिकवित असल्याचा दावा त्यात केला होता. याशिवाय डिशचे रिचार्ज देखील त्यांनी तलाठ्याकडून लाच स्वरुपात करुन घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीमुळे महसूल अधिकार्‍यामध्ये खळबळ उडाली होती. या तक्रार अर्जावरुन जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी सुरु केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांची इतरत्र बदली करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे.