बीड, दि.5 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा वेग आता वाढला असून गेवराईत केलेल्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये 28 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 80 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या 1145 वर जाऊन पोहोचली आहे. यात बाहेर जिल्ह्यात मृत्यू झालेल्या व तिकडेच पोर्टलवर नोंद असलेल्या 4 जणांचा देखील समावेश आहे.बीड तालुक्यात 14, अंबाजोगाईत 6, परळीत 29, गेवराईत 35, (अॅन्टीजन टेस्ट 28,) माजलगाव 6, केजमध्ये 11, धारूर 1, पाटोदा 1, आष्टी 5, रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.बीडमधील आता एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 1145 झाला असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण धरून उपचाराखालील संख्या आता 569 झाली आहे. तर 537 जण आतापर्यंत बरे झालेले आहेत.केजमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यूजिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला. शहरातील अजीजपुरा भागातील 55 वर्षीय इसमाचा बुधवारी सकाळी अंबाजोगाईच्या रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदरील इसम आडस येथे ग्रा.पं.कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्याची मृत्यूसंख्या आता 39 झालेली आहे. यात विविध जिल्ह्यात उपचारादरम्यान मृत झालेल्या 4 जणांचाही समावेश आहे.
प्रशासनाकडून आज जाहीर झालेली यादी खाली पहा…