शेतातील बांधाच्या वादातून तरुणावर हल्ला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड शेती

 बीड : शेतातील बांधाच्या वादातून एका तरुणावर हल्ला करण्यात आला. यामध्ये तरुणाच्या डोक्यात गंभीर जखम झाली आहे. ही घटना बीड तालुक्यातील वासनवाडी येथे गुरुवारी (दि.6) सकाळी घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन धोंडीराम खरसाडे (वय 20 रा.वासनवाडी ता.बीड) असे जखमीचे नाव आहे. शेतात फवारणीसाठी गेले असता शेजारच्या शेतकर्‍यासोबत बांधावरुन वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये सुदर्शन यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. या प्रकरणी सुमंत खरसाडे, वचिष्ट खरसाडे, आशा खरसाडे, जयश्री खरसाडे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged