न्यूज ऑफ द डे

जिल्ह्यात फक्त शिक्षकांच्या विनंती बदल्यांनाच कोरोनाची अडचण का?

By Karyarambh Team

August 06, 2020

echo adrotate_group(3);

बीड : जिल्हा परिषदेत बदल्यांचे वारू वाहू लागले आहे. या विभागातील सर्वात मोठी आस्थापना असलेल्या शिक्षकांच्या बदल्या यंदा वादात सापडल्या आहेत. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. परंतू बदल्या प्रशासकीय करायच्या की विनंतीने यात जवळपास पंधरवाडा उलटून गेला तरी संभ्रम कायम होता. यातच दि.5 ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने पत्र काढून शिक्षकांच्या फक्त विनंती बदल्या कराव्यात अशा सूचना जिल्हा परिषदांना दिल्या. असे असले तरी बीड जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या विनंती बदल्या रद्द करण्याबाबत हालचाली दिवसभर सुरु होत्या.echo adrotate_group(7);

जिल्ह्यातील अनेक शिक्षक विनंती बदलीसाठी इच्छुक असून शिक्षकांमध्ये रोष दिसून येत आहे. कारण इतर विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या जिल्हा प्रशासनाने केल्या फक्त शिक्षकांच्याच विनंती बदल्या का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण प्रशासनाच्य वतीने सांगण्यात येत असले तरी मग इतर विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करताना कोरोना नसतो का? असा प्रश्न शिक्षक उपस्थित करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाला स्थगिती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आहेत का? आणि असतील तर मग इतर विभागाच्या कर्मचार्‍यांच्या बदल्या का स्थगित केल्या नाहीत? याबाबत काही शिक्षकांशी चर्चा केली असता विनंती बदल्या रद्दचा निर्णय जर जिल्हा परिषदने घेतला तर आम्ही हे प्रकरण कोर्टात नेऊ असे सांगितले आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसात नेमक्या शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार की नाही हे स्पष्ट होईल. आणि जर रद्द झाल्या तर इच्छुक शिक्षक कोर्टात जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.echo adrotate_group(5); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);