corona

कोरोना: बीडकरांनी पुन्हा शतक ठोकले

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड, दि.6 : बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आजही शंभरच्या पार गेला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालांतून 124 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. एकूण 721 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 591 निगेटिव्ह तर 6 अनिर्णित आहेत.
बीड तालुक्यात सर्वाधिक 33, अंबाजोगाईत 13, धारूर2, गेवराई व केजमध्ये प्रत्येकी 14, माजलगाव 15, परळी 31, वडवणी 2 असे एकूण 124 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्याची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 1269 झाली आहे. त्यात 574 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा तपशील जिल्हा प्रशासन रात्री उशीरा जाहीर करणार आहे.

Tagged