SCHOOL

करिअर

1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर काळात शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार

By Karyarambh Team

August 07, 2020

echo adrotate_group(3);

शाळा सुरू करण्याबाबत स्वित्झर्लंडचे मॉडेल डोळ्यासमोर

कोरोना काळात शिक्षण क्षेत्राचे मोठे नुकान झाले आहे. यात शिक्षक आणि विद्यार्थी असे दूहेरी नुकसान पुर्ण देशाला सोसावे लागत आहे. आता मात्र, हे थांबण्यासाठी 1 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर या काळात टप्प्याटप्याने शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अनलॉक 4 च्या टप्यात ज्या गाईडलाईन्स ऑगस्टअखेरीस येतील त्यात शाळांबाबतही नियमावली राज्यांना दिली जाऊ शकते.echo adrotate_group(7);

साधारणपणे मार्च महिन्यापासून देशातल्या शाळा बंद आहेत. ऑगस्टमध्ये त्याला सहा महिने पूर्ण होतील. सलग सहा महिने शाळा बंद ठेवल्यामुळे शैक्षणिक प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यामुळेच आता शाळांबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, अशी केंद्र सरकारची धारणा आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही याबाबतच्या गाईडलाईन्सवर काम करणार आहे.echo adrotate_group(5);

शाळा सुरु करताना असा असू शकतो सरकारचा प्लॅन 1. दहावी ते बारावी या वयोगटातल्या शाळा आधी सुरु होऊ शकतात.2. नंतर पाचवी ते दहावीचे वर्ग सुरु होऊ शकतात3. शाळा दोन शिफ्टमध्ये चालवाव्यात…एक सकाळची शिफ्ट आणि दुसरी दुपारची शिफ्ट4. दोन शिफ्टच्या मध्ये एक तासांचं अंतर असावं, ज्यात वर्ग सॅनिटायझ करण्यात येतील5. पूर्व प्राथमिक, प्राथमिक वर्ग सुरु करण्याबाबत मात्र इतक्यात केंद्राचीही अनुकूलता नाही.echo adrotate_group(9);

पालकांची मानसिकताही लक्षात घेणे गरजेचे असणार आहे. मागे केंद्राने केलेल्या सर्व्हेमध्ये पालकांनी शाळा सुरू करण्याला विरोध दर्शवला होता. अर्थात शाळा सुरु करण्याबाबत केंद्राने गाईडलाईन्स केल्या तरी अंतिम निर्णय हा राज्य सरकारांवरच सोपवला जाणार आहे.

असे आहे स्वित्झर्लंडचे मॉडेलजगभरात अनेक देशांनी स्वित्झर्लंडच्या शाळा सुरु करण्याच्या पद्धतीचं अनुकरण केलं आहे. स्वित्झर्लंडमध्ये 10 मे पासूनच शाळा सुरु झाल्या आहेत. युरोपात ज्या इटलीत सर्वाधिक उद्रेक झाला, त्याची सीमा लागून असूनही स्वित्झर्लंडने हे करुन दाखवलं हे विशेष.त्यांनी वर्गातल्या विद्यार्थ्यांची संख्या निम्मी केली, आलटून पालटून त्यांनी शाळेत यायची सूचना केली. त्यामुळे निम्मे विद्यार्थी शाळेत, निम्मे ऑनलाईन अशी शिकवणी सुरु झाली.डेस्कचं अंतर सोशल डिस्टन्सिंगनुसार करणं, जे धोकादायक कॅटेगरीत येतात अशा कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होम सांगणं, कॅन्टीनसारख्या ठिकाणी वन वे ट्रॅफिक करणं असेही उपाय स्वित्झर्लंडने केले.

echo adrotate_group(1);