CORONA

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आजही 113 जण पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

August 08, 2020

बीड, दि.7 : बीड जिल्ह्यात आजही 113 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात बीड तालुक्यात 20, अंबाजोगाई 22, परळी 28, केज 24, धारूर 1, माजलगाव 5, शिरूर 2, आष्टी 1, गेवराई 10 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. आज प्राप्त झालेल्या 652 पैकी 532 निगेटिव्ह तर 7 अनिर्णित आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेले रिपोर्ट पहा

1
2
3

जिल्हा अपडेट 7 ऑगस्टएकूण रुग्ण – 1382मयत – 43अ‍ॅक्टिव रुग्ण – 765बरे झालेले- 574खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिगृहीतबीड शहरातील कोविड रुग्णांची संख्या दिवसें दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची आयएमए संघटना बीड शाखा यांच्या सहकार्याने खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांच्या सेवा उपलब्ध होणार असून जिल्हा कोविड रुग्णालय, बीड येथे पुढील 15 दिवसांसाठी हे डॉक्टर्स रुग्णसेवेसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्णवेळ उपस्थित राहतीलयासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश पारीत केले आहेत. यामुळे कोविड रुग्णालय बीड येथे सेवा देण्यास पुढे आलेले खाजगी वैद्यकिय व्यायसायीकयांच्या सेवा पुढील 15 दिवसांसाठी अधिगृहित केलेल्या असून खाजगी वैद्यकिय व्यावसायीक तेथे सेवा देतील. कोव्हीड-19 विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने सदर कार्यवाही केली जात आहे