बीड, दि.10 : बीड जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वरचेवर वाढत चालली आहे. रविवारी केलेल्या तपासणीचे अहवाल प्रशासनाने सोमवारी सकाळी जाहीर केले. त्यात 233 जण पॉझिटिव्ह आढळले तर सोमवारी केलेल्या तपासणीचे अहवाल सोमवारी रात्री उशीरा जाहीर केले. त्यात 230 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे बीड जिल्ह्याची रुग्णसंख्या आता प्रचंड वाढली आहे.बीड शहरात मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अॅन्टीजेन तपासणीत शनिवारी 86, रविवारी 137 आणि सोमवारी 131 असे मिळून 354 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोमवारी रात्री उशीरा जाहीर केलेल्या अहवालात बीडमध्ये सर्वाधिक 163 (अॅन्टीजेन धरून) अंबाजोगाईत 15, धारूर, गेवराई, शिरूरमध्ये प्रत्येकी 3, केजमध्ये 13, माजलगावात 7, परळीत 15, आष्टीत 8, रुग्ण आढळून आले आहेत. एकूणच सोमवारी प्रशासनाने 463 रुग्णांची नोंद जाहीर केली आहे. आता जाहीर केलेल्या रुग्णांचा सविस्तर तपशील प्रशासन रात्री उशीरा देण्याची शक्यता आहे.कोरोना अपडेट 10 ऑगस्टमयत – 49अॅक्टिव रुग्ण – 1285बरे झालेले – 714एकूण रुग्ण – 2048