बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (दि.12) तब्बल 115 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाला एकूण 658 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 543 अहवाल निगेटिव्ह आहेत. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यात 9, बीड -40, धारुर -5, केज -14, माजलगाव -21, परळी -15, शिरुर -4, वडवणी-1, गेवराई तालुक्यात 6 असे एकूण 115 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.
बीड कोरोना अपडेटएकूण रुग्ण- 2253बरे झालेले रुग्ण- 856एकूण मृत्यू- 53उपचार सुरु- 1344आजचा प्रशासनाकडून प्राप्त अहवाल खालीलप्रमाणे