pranav mukherjee

कोरोना अपडेट

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात

By Karyarambh Team

August 13, 2020

दिल्ली : कोरोनाने देशात अक्षरशः थैमान घातले आहे. अशातच बॉलिवूड, राजकारण यातील सुद्धा अनेक मान्यवरांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रणव मुखर्जी यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोमात गेले आहेत.

त्यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. त्यांना व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आलं आहे. आर्मी रुग्णालयाने ही माहिती दिली. त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

१० ऑगस्टपासून प्रणव मुखर्जी यांची प्रकृती बिघडली आहे. १० तारखेच्या एक दिवस आधीच त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. १० ऑगस्ट रोजी त्यांच्या मेंदूत असलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झालेली नाही. आता ते कोमात गेले आहेत असं आर्मी रुग्णालयाने स्पष्ट केलं आहे.