atyachar

20 वर्षीय विवाहितेवर अत्याचार

क्राईम पाटोदा बीड

भुरेवाडीतील घटना; आरोपी अल्पयवीन

बीड, दि.13 : एका 20 वर्षीय विवाहितेस एकटीला पाहून गावालगतच्या तलावाजवळ एका साडे सोळा वर्षीय मुलाने अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी (ता.पाटोदा) येथे घडली होती. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी भुरेवाडी येथे एका विवाहितेस गावालगतच्या तलावाजवळ एकटीला पाहून एका अल्पवयीन आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरुन पाटोदा पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात बुधवारी रात्री उशिरा गु.र.नं.172/2020 नुसार कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणाचा तपास सपोनि.कोळेकर हे करीत आहेत. दरम्यान, आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

सूचना एक तर्क अनेक; पोद्दार
यांच्या कार्यकाळात नवाच पायंडा

एखाद्या गुन्ह्यात आरोपी अल्पवयीन असतील तर अशा आरोपीचे नाव माध्यमांना दिले जाऊ नये, अशा सुचना पोलीस अधीक्षकांनी ठाण्यांना केलेल्या असाव्यात परंतु पोलीस कुठल्याच प्रकरणाची माहिती हल्ली देत नाहीत. माहिती देऊ नका, वरीष्ठांचे तसे आदेश आहेत, एवढी सूचना प्रत्येक ठाण्यातून हल्ली ऐकायला मिळते. पोलीस अधीक्षकांनी ठाणेप्रमुखांना नेमक्या काय आणि कुठल्या गुन्ह्यात आरोपीचे नाव दिले जाऊ नये याच्या सुचना दिल्यात याची एकदा उजळणी घेण्याची गरज आहे.

पोलीस अधीक्षकांकडूनही प्रतिसाद नाही
ठाण्यातील पोलीस अधिकारी ही घटना लपवत असल्याने कार्यारंभने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांनी देखील भ्रमध्वनी घेतला नाही. त्यांनी एसएमएस करण्यास सांगितले. कार्यारंभने त्यांना एसएमसने माहिती विचारली मात्र त्यांनी औरंगाबादेत मिटींगमध्ये असल्याचे कारण देत उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याची सुचना केली. आष्टीचे उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कॉल रिसिव्ह केला नाही. ठाण्यात माहिती दिली जात नाही, तपासअधिकारी माहिती देत नाहीत. वरीष्ठ अधिकारी फोन उचलत नाहीत, जिल्ह्याचे पोलीस प्रमुख खालच्या अधिकार्‍यांकडे संपर्क साधा सांगतात. हे नेमकं काय सुरुये? पोलीसांना घटना लपवायची आहे का? असा प्रश्न आता पडल्यावाचून रहात नाही.

Tagged