corona virus

कोरोना अपडेट

सोलापूर राष्ट्रवादीच्या पाटील कुटुंबावर कोरोनाचा घाला; सहा दिवसात तिघांचा मृत्यू

By Karyarambh Team

August 13, 2020

echo adrotate_group(3);

सोलापूर, दि.13 : पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात आज चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे. येथील भोसे गावचे पाटील कुटूंबावर कोरोनाने अक्षरशः घाला घातला आहे. एकाच घरातील तिघांचा मागील चार दिवसात मृत्यू झाला आहे. कोरोनाने ओढवलेल्या या संकटात पाटील कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा आज मृत्यू झाला. त्यांचा लहान भाऊ महेश याचा चार दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोन दिवस आधी चुलते अनंतराव पाटील यांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. अवघ्या सहा दिवसात पाटील कुटुंबावर ओढवलेल्या या संकटाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. भोसे गावात कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यावर दहा दिवसांपूर्वी पाटील कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला होता. पाटील कुटुंबातील 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. इतरांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी या तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले राजूबापू पाटील हे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. काल मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राजूबापू पाटील हे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते. या भागातील उसाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कृषिराज शुगर या साखर कारखान्याची उभारणी देखील केली होती.सध्या पंढरपूर तालुक्यात करोनाचा कहर सुरु असून भोसे गावात 62 करोनाचे रुग्ण आढळले आहेत. राजूबापू पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच भोसे, करकंब भागात कडकडीत बंद पाळण्यात येत असून भोसे गावाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी सील केले आहेत. राजूबापू पाटील यांचा मृत्यू सोलापुरात झाल्याने त्यांचा मृतदेहावर सोलापुरातच अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.echo adrotate_group(6); echo adrotate_group(10);echo adrotate_group(8);