bindusara prakalp

बिंदुसरा प्रकल्प भरला! आता माजलगावची बारी

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

नगराध्यक्ष भारतभुषण क्षीरसागर यांनी केले जलपुजन

बीड, दि.16 : बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा प्रकल्प 99 टक्के भरला असून ते आता छोट्या चादरीवरून केव्हाही वाहण्याची शक्यता आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने याचा परिणाम आपल्याला बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बिंदुसरा भरल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहरासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास व्यक्त केला आहे

आज बीड नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरण 99 टक्के भरले असल्याने या ठिकाणी जाऊन श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले. पावसाचे प्रमाण वाढल्यास सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष यांनी केले.
नदीकाठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आली सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले.तसेच आगामी काळात बीड शहराला पिण्याचे पाणी मुबलक मिळेल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास व्यक्त केला आहे योग्य नियोजन करून पाणी पुरवठा केला जाईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे पाणीपुरवठा सभापती रवींद्र कदम नगरसेवक गणेश वाघमारे यांच्यासह नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना परिस्थिती असल्याने शासनाचे नियम पाळून हा जल पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.

माजलगाव धरण 68 टक्क्यांवर
मराठवाड्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण असलेल्या माजलगाव धरणाची पाणी पातळी 68 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. माजलगावच्या पाणलोट क्षेत्रात बिंदुसरा प्रकल्प येत असल्याने आता माजलगाव धरण भरण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. यापुर्वीच अप्पर कुंडलीका हा माजलगावच्या पाणलोट क्षेत्रातील प्रकल्प भरलेला आहे. माजलगाव धरण हे सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका या तीन नद्याच्या पाणलोट क्षेत्रात पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे.

Tagged