pankja munde

शून्यापासून सुरु केलं, चांगलं जमेलं थोडे दिवसात

परळी बीड राजकारण

बीड ः विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांना डावलल्यानंतर सोशल मीडियावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मुंडे समर्थक संताप व्यक्त करत आहेत. याबाबत पंकजाताई मुंडे यांनी मौन बाळगलेले असले तरी आज त्यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधणारे एक सूचक ट्वीट केलं आहे.
पंकजाताई मुंडे यांनी दोन छायाचित्र पोस्ट करत ट्वीटमध्ये म्हटले आहे की, स्वतःच स्वतःला शिकवते आहे..शून्यापासून सुरु केलं..चित्र चांगलं जमेलं थोडे दिवसात असे त्यांनी ट्वीट केले आहे. या ट्वीटला सूचक मानले जात आहे. विधान परिषद निवडणुकीत डावलण्यात आलेल्या नेत्यापैकी एकनाथ खडसे यांनी नाराजी व्यक्त करत पक्षांतर करण्याचा इशारा भाजपला दिला आहे. असे असताना मात्र पंकजाताई मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देणारे एक ट्वीट दोन दिवसापूर्वी केले होते. त्यानंतर त्या काहीतरी भुमिका घेतली अशी राज्यभरातील त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती. परंतु त्याबाबत थेटपणे अद्याप तरी त्यांनी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. शून्यापासून सुरु केलं आहे, चित्र चांगलं जमेलं थोडे दिवसात अशा शब्दात ट्वीट केल्याने त्या नव्याने राजकीय सुरुवातील करतील काय? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

Tagged