नवी दिल्ली ः देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीबद्दल दिल्ली येथील आर्मी हॉस्पिटलने पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या प्रकृतीत गेल्या काही तासापासून कोणताही बदल झालेला नाही. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या ते व्हेंटिलेटर असल्याचे आर्मी हॉस्पिटलकडून सांगण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने 11 वाजून 13 मिनिटांनी ही माहिती दिली आहे. आर्मी हॉस्टिपलच्या माहिनुसार, प्रणव मुखर्जी हे 84 वर्षांचे आहेत. त्यांचे क्लिनिकल पॅरामीटर्स आणि व्हाइटल स्थिर आहेत आणि ते सतत व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना आधीच अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यांच्या आरोग्याची स्थिती तज्ञांकडून बारकाईने पाळली जात आहे, असे सांगितले. दुसरीकडे त्याचवेळी त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी म्हणाले होते की, आता ते पूर्वीपेक्षा चांगले आणि स्थिर आहेत. त्यांच्यावर उपचारांचा सकारात्मक परिणाम होतो. आमचा ठाम विश्वास आहे की ते लवकरच आपल्यात परत येतील. दरम्यान, मुखर्जी यांच्यावर मेंदूत शस्त्रक्रिया झाली. तत्पूर्वी त्यांची कोविड 19 चा तपास अहवालही सकारात्मक आला, असेही सांगितले आहे.