डॉक्टरांची ताकद एवढी अफाट असते की त्यांनी कंपाऊंडर घडवले : खा.संजय राऊत

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

मुंबई : डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत व्यक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करावी आणि आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच मार्ड या संघटनांनी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे ते म्हणाले, मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डॉक्टरांचा अपमान केला नाही. काही विशिष्ट पक्षाची लोकं डॉक्टरांना हाताशी घेऊन मोहीम करत आहेत. डब्ल्यूएचओ ही एक राजकीय संघटना तयार झाली आहे ट्रम्प आणि रशियानंही विरोध केला आहे. मी दिलगिरी व्यक्त करून, ट्र्म्प आणि पुतिन यांनी थकज बद्दल केलेले वक्तव्य पुसून जाणार आहेत का? मी थकज बद्दल बोललो होतो त्याचा आणि आपल्या डॉक्टरांचा काय संबंध आहे? असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेते का? पुतीन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, डॉक्टर मंडळी आमचीच आहे. डॉक्टरांच्या मदतीला मी स्वत: गेलो होतो. डॉक्टर अव्वाच्या सव्वा बील देत होते त्यांच्या विरोधात आंदोलनं होत होती. तेव्हा मी डॉक्टरांच्या मदतीला धावलो आहे. ते म्हणाले की, नरेंद्र मोदींनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला होता. आमच्याकडील डॉक्टर कसे व्यापारी आहेत आणि त्यांन रुग्णसेवेत रस नसून औषधं विकण्यात आणि पैसै कमावण्यात कसा रस आहे आहे यासंबंधी हे वक्तव्य आहे. लंडन येथील डॉक्टरांनी त्यांचा निषेध केला होता, इथल्या नाही. त्यावेळी येथील संघटनांनी आक्षेप घेतला नाही, असं राऊत म्हणाले. जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती, असं देखील ते म्हणाले.

Tagged